कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, तीन जण जखमी

IMG-20141220-WA0010 IMG-20141220-WA0011
यवतमाळ,दि. २० – कारने  दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये एक ठार तर तीन जण जखमी झाले. हि घटना आज शनिवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास भारी विमानतळाजवळ घडली. अविनाश शिवाजी कुकडे (२६) रा. आठवडी बाजार असे मृतकाचे नाव असून, निखील गुगरे (२०) रा. तारपूरा गंभिर तर विजय कुलसंगे रा. वरूड ता. देवळी व शेख इस्त्राईल अशी जखमीची नावे आहे.
अविनाश, निखील, विजय हे तिघे यवतमाळवरून एम. एच. २९ पी ६६७७ क्रमांकाच्या दुचाकीने चापडोह येथे जात होते. दरम्यान खडकीवरून भरधाव वेगाने येणाºया एम. एच. ३१ एयच १३०५ क्रमांकाच्या अ‍ॅल्टो वाहनाने समोरासमोर धडक दिली. या धडकेत अविनाश जागीच ठार झाला असून, निखील गंभिर तर विजय व अ‍ॅल्टो वाहनाचा चालक शेख इसराईल हे दोघे जखमी झाले. त्यांना येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना नागपूर हलविले. या अपघातामध्ये दुचाकी चकनाचूर झाली असून, अ‍ॅल्टोचेही नुकसान झाले आहे. याबाबत मृतकाचा भाऊ विश्वनाथ कुकडे (३९) रा. आठवडीबाजार यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार नोंद केली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 + = sixteen