
दिल्ली- परदेशातील बँकांमध्ये असलेल्या ४२७ खाताधारकांपैकी २५० जणांनी अशा प्रकारची खाती असल्याचे मान्य केल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी सांगितले. काळ्या पैशाच्या मुद्दावर राज्यासभेत सुरु असलेल्या चर्चे दरम्यान त्यांनी ही माहिती दिली. तसेच या प्रकरणी सरकार योग्य मार्गावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परदेशात असलेला काळा पैसा परत आणण्यासाठी काही वेळ लागेल. या प्रकरणी ४२७ खातेधारकांची यादी तयार असून त्याची चौकशी सुरु असल्याचे जेटली यांनी सांगितले.
लोकसभा निडवणुकीत भाजपने काळा पैसा १०० दिवसात परत आणण्याचे आश्वासन दिले होते. यावरून विरोधी पक्षांनी सभागृहात गदारोळ केला. इतक नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान प्रत्येक भारतीय नागरिकाला १५ ते २० लाख रुपये मिळतील असे ही सांगितले होते. राज्यसभात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, जनता दल संयुक्त, समाजवादी पक्ष, डावी आघाडी यांनी या मुद्दयावरुन गदारोळ केला आणि सभात्याग केला. या प्रकरणी सरकारने आश्वासन पूर्ण न केल्याबद्दल देशाची माफी मागावी असी मागणी विरोधकांनी केली.
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ६२७ जणांची यादी दिली आहे. यापैकी ४२७ जणांची ओळख पटली असून त्यापैकी २५० जणांनी परदेशातील बँकांमध्ये खाती असल्याचे मान्य केल्याचे जेटली म्हणाले.
या प्रकरणी आधीच्या सरकारने जे केले आहे, त्यापेक्षा अधिक भाजप सरकारने १०० दिवसात केल्याचा दावा जेटली यांनी केला.









