
यवतमाळ, दि. १ – कुलरला स्पर्श झाल्याने शॉक लागल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी दुपारी २ वाजता शिरभाते प्लॉट येथे उघडकीस आली. यशांत कैलास नगराळे (५) रा. शिरभाते प्लॉट यवतमाळ असे मृत बालकाचे नाव आहे. आज दुपारी तो आपल्या घरी खेळत होता. अशातच त्याचा कुलरला स्पर्श झाल्याने तो बेशुद्घ पडला होता. ही बाब लक्षात येताच त्याच्या कुटुंबीयांनी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी यशांतला मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.









