कूपनलिकेत पडलेल्या चिमुरडय़ाची सुटका

कूपनलिकेत पडलेल्या चिमुरडय़ाची सुटका
अहमदनगर : ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांना आला.. येथील खैरी निमगाव शिवारातील एका कूपनलिकेमध्ये अडकलेल्या चिमुरडय़ाला सुखरूपणे बाहेर काढण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे. येथील पटारे यांच्या वस्तीवर ऊस तोडणी कामगार काम करत असताना विलास निकम या ऊस तोडणी कामगाराचा १८ महिन्यांचा चिमुकला शेजारीच शेतात असलेल्या
एका कूपनलिकेमध्ये पडला होता. या मुलाचा ३ वर्षाचा भाऊ बरोबर खेळत होता. त्याने आपला भाऊ खड्डय़ात पडल्याचे पाहून त्याने आईवडिलांना सांगितले. यानंतर तातडीनं या ठिकाणी मदत कार्य सुरू झाले.
दीडशे फूट खोल असलेल्या या कूपनलिकेमध्ये हा मुलगा तीस फुटांवर अडकला होता. गावकरी आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने या ठिकाणी मदकार्य सुरू केले. मुलाला ऑक्सिजनचा पुरवठाही करण्यात आला. तीन डोझरच्या सहाय्याने मुलाची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर रात्री उशिरा या चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. सध्या त्याला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


four + = 10