कॅनव्हातील गाडीसमोर पोलिसाला ढकलले , मोंदीना भेटण्यासाठी खटाटोप

यवतमाळ – आर्णी मार्गावरील मांगुळ येथे बंदोबस्त करणाºया पोलिसाला गाडीसमोर ढकलुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री ८.३० वाजता मांगुळ येथे घडली. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे वाहन अडवून त्याच्यासोबत चर्चा करण्यासाठी दोन भावंडानी हा प्रयत्न केल्याचे बोलल्या जात आहे.
आर्णी तालुक्यातील दाभडी (बोरगाव) येथे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम होता. त्यानिमित्य गुरुवारी सकाळपासून आर्णी रोडवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यवतमाळ शहरचे पोलिस शिपायी दर्शन दिकोंडवार (२५) हे मांगुळ येथे तैनात होते. अशातच आरोपी विजय मधुकर टोने (३५), राजू मधुकर टोने यानी मांगुळ येथे रस्त्यावर मोठमोठी दगड ठेवले. ना. मोदी यांचे वाहन येथे थांबावे व आपण त्याच्यासोबत चर्चा करावी असा त्याचा उद्देश होता. ही बाब निदर्शनास येताच पोलिस शिपायी दिकोंडवार दगड उचलले. त्यामुळे संतप्त झालेल्या टोने बंधुनी आर्णी कडून यवतमाळकडे येणाºया कॅनव्हातील गाडी समोर सदर पोलिसाला ढकलुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी दिकोंडावार यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी टोने बंधुविरुद्घ भादंवि कलम ३०७, ३५३, ५०६, २९४, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


eight − = 0