
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय होईल आणि केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार येईल असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
सध्या विविध जाहीर होणारे ओपिनियन पोल म्हणजे एक मोठा विनोद असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला २००९ लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या २०६पेक्षा अधिक जागा मिळतील. याआधीही २००४ आणि २००९मध्ये ओपीनीनय पोलमध्ये काँग्रेसचा पराभव होईल असे सांगण्यात येत होते. मात्र पत्यक्षात काँग्रेसने चांगली कामगिरी केल्याची आठवण काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी करुन दिली.या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपासून डीएमके आणि तृणमूल काँग्रेस पक्ष वेगळे झाले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस, आरजेडी, जेएमएम, आरएलडी आणि नॅशनल कॉन्फरन्स या काँग्रेस पक्षाची आघाडी असल्याचे राहुल यांनी सांगितले.जर पुन्हा तृणमूल अथवा डेएमके सोबत आघाडी करावी लागली तर आम्ही नक्की त्याच्यासोबत आघाडी करु असेही ते म्हणाले. काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि राजकीय विचारांशी जवळीक असणा-या पक्षांना आम्ही सोबत घेऊ.









