केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात १० टक्के वाढ

केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात १० टक्के वाढ
नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या सर्व कर्मचा-यांना महागाई भत्त्यात १० टक्के वाढ करून तो १०० टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा फायदा ५० लाख कर्मचा-यांना आणि ३० लाख निवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे.
१ जानेवारी २०१४ पासूनच्या पूर्वलक्ष्यी प्रभावाने तो मिळेल.औद्योगिक कामगारांच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकानुसार हा महागाई भत्ता मिळणार आहे. महागाई भत्त्यात १०० टक्के वाढ झाल्याने सरकारने वेतन आणि महागाई भत्ता हा मूळ पगारात समाविष्ट करावा, अशी मागणी होत आहे.
राहणीमानाच्या खर्चात ३०० टक्के वाढ झालेली असताना सरकार केवळ १०० टक्के महागाई भत्ता देत आहे. त्यामुळे या वाढीचा फार मोठा फरक पडणार नाही, असे कर्मचारी संघटनेने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 − five =