केजरीवाल काँग्रेसचे एजंट- रामदेवबाबा

Kejriwal_sl_23_10_2010
नागपूर- आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल म्हणजे केजरी’बवाल’ असल्याची कोटी करून, ते काँग्रेसचे एजंट असल्याचा आरोप योगगुरू रामदेवबाबा यांनी केला.योग महोत्सवानिमित्त रविवारी नागपुरात आलेल्या रामदेवबाबांनी ‘मिनी रोड शो’द्वारे ‘डोअर टू डोअर’ फिरून सत्ता परिवर्तनाचे नागरिकांना आवाहन केले.
भ्रष्टाचार रोखणे, गोरक्षा आदीशी संबंधित ९ मुद्दे बाबांनी उपस्थित केले आहेत. त्यावर भाजपचे नागपुरातील उमेदवार नितीन गडकरी यांनी पहिली स्वाक्षरी केली.केजरीवाल यांचे संकल्प अंमलात येण्यापूर्वीच संपुष्टात आले व ते केजरी’बवाल’ झाले. सर्वसामान्यांच्या आशेवर त्यांनी पाणी फेरले. त्यांच्या कथनी आणि करणीत बरेच अंतर आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याचा निर्धार केल्यानंतरही सर्वाधिक भ्रष्ट काँग्रेसची साथ ते देत आहेत. पंजाविना झाडू चालू शकत नाही, हे त्यांनी सिद्ध केले, अशी टीका त्यांनी पत्र​परिषदेत केली.अरविंद केजरीवाल बोफोर्स, टू जी स्पेक्ट्रम, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आदर्श, ऑगस्टा वेस्ट लँड आदी घोटाळ्यांबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. रॉबर्ट वड्रा, ए. राजा, कनिमोझी यांना ते विसरले. त्यांचा एकमेव निशाणा म्हणजे नरेंद्र मोदी आहेत, असे सांगून रामदेवबाबांनी मोदी यांच्यासह भाजपची जोरदार वकिली केली.अरविंद केजरीवाल यांनी वाराणसीतून निवडणूक लढण्याची शक्यता असल्याकडे लक्ष वेधले असता, ‘गिधड की जब मौत आती है तो वह गाँव की तरफ भागता है’ असे सांगून बाबा म्हणाले, ‘काँग्रेसच्या स्पीड ब्रेकर, एजन्टच्या रूपात केजरीवाल यांना समोर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 − seven =