
कल्याण-डोंबिवली महापालिकेत अायुक्त कार्यालयात नोंद न होता,काही फाईली अधिकारी काखेत घालून येत असतात.अधिकार्यांच्या या बेशिस्तपणाला लगाम घालण्यासाठी अायुक्त अर्दड यांनी एका परिपत्रकाद्वारे अधिकार्यांचे कान पिरगळले अाहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात विविध कामानिमित्त अायुक्तांच्या दालनात येणार्या अधिकार्यांनी बेशिस्तीने येऊ नये यासाठी अायुक्त अर्दड यांनी हे परिपत्रक काढले अाहे.कार्यालयात येणार्या फाईलची नोंद न होता,अधिकारी वर्ग फाईल काखेत घालून अाणत असल्याचे निदर्शनास अाल्याने अायुक्तांनी हे परिपत्रक काढले अाहे.
सामान्य प्रशासनाचे उपायुक्त यांनी फाईल काखेत घालून अाणले हे निदर्शनास अाल्यानंतर अायुक्तांनी शिस्तपालनाचे हे परिपत्रक काढल्याचे बोलले जात अाहे.तसेच घनकचरा,मालमत्ता,पाणीपट्टी,तांत्रिक,सामान्य प्रशासन,नगर रचना,अतिक्रमण व परिवहन विभागाच्या येणार्या फाईल ही संबंधित खाते प्रमुखांनी घेऊन न येण्याचे सुचना अायुक्त अर्दड यांनी केली अाहे,हा बेशिस्तपणा असुन ,अायुक्त कार्यालयातील अावक-जावक संबंधित कार्यालयात नोंदणी झाल्यानंतर वेळोवेळी सादर करण्याचे अादेश अर्दड यांनी दिले अाहे.









