
नागपूर – नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पलायन केलेल्या ५ कैद्यांना पळून जाण्यात मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. कैदी फरार प्रकरणात ही पहिलीच अटक आहे.
नवाब तोहिद खान आणि गणेश शर्मा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. धंतोली पोलिसांनी ही कारवाई केली. ३१ मार्च रोजी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून ५ कैद्यांनी पलायन केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.









