
कोल्हापूर- शहरातील टोल आकारणीवरून सोमवारी पुन्हा एकदा राडा झाला. स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आयआरबीचे शहरातील सर्व टोल नाक्यांची तोडफोड केली.
आयआरबीच्या तीन कर्मचा-यांकडून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांना रविवारी शाहू टोल नाक्यावर धक्काबुक्की करण्यात आली होती. यामुळे संतप्त झालेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिरोली येथील टोल वसुली नाका क्रेनने उचकडून त्यांची मोडतोड केली. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी शिये व शाहू टोल नाक्यांची देखील तोडफोड केली. दरम्यान या प्रकारानंतर सर्वच टोल नाक्यावरील पोलिस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.









