कोळपे मल्टीस्टेटचा उमरखेड मधून पोबारा, ९ ग्राहकांना गंडविले

4416_1
उमरखेड, दि. २० – स्थानिक बसस्थानका समोरील कॉम्प्लेक्समध्ये पुणे येथील कोळपे पाटील मल्टी को-आॅपरेटीव्ह सोसायटीची शाखा उघडण्यात आली होती. मल्टीस्टेटने उमरखेडमधून पोबारा केल्याने गुंतवणूक दारात खळबळ उडाली आहे.
अन्य बँके पेक्षा अधिक व्याज दराचे प्रलोभन दाखवून ग्राहक तयार करण्यात आले. ग्राहकांना विश्वासात न घेता कोळपे मल्टीस्टेटच्या कर्मचाºयांनी पूर्व सूचना न देता या ठिकाणावरून पोबारा केल्याने ग्राहकात विविध चर्चेला उधाण आले आहे.  अनिल कलाने यांनी ७१ हजार पाचशे रुपयाने फसवणूक करण्यात आल्याची तक्रार काल पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून बँक प्रतिनिधी अतुल अन्नदाते, व्यवस्थापक, अध्यक्ष कोळपे पाटील रा. पुणे यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा झाला आहे. मागील जवळपास दोन वर्षांपासून कोळपे पाटील या मल्टीस्टेट सोसायटीने शहरात बस्तान मांडले होते. व्याजदर अधिक देण्याचे प्रलोभन दिल्याने शेकडो गुंतवणुकदारांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे, याचे बळी शहरातील गुंतवणुकदार ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


7 + five =