
यवतमाळ, दि. १ – क्रिकेट खेळण्यावरून पराभव होण्याच्या मार्गावर असलेल्या खेळाडूंनी विजयी होणाºया संघातील खेळाडूंना मारहाण केल्याची घटना रविवारी पोस्टल मैदानात ही घटना घडली. रविवारी येथील पोस्टल मैदानावर क्रिकेट सामन्याचे आयोजन केले होते. सायंकाळी शिवनेरी व एस.आर.सी.सी. संघामध्ये सामना सुरू होता. अशातच शिवनेरी संघ विजयी होण्याच्या मार्गावर होता. त्यामुळे चिडून एसआरसीसी संघाचे खेळाडू मोहसीन, सोहेल देशमुख, शान अहेमद, सहेजाद, हर्षल, नकीब, शकीब राज, शारीक, रेहान, जुबेर, नसीम व अन्य दोन सर्व रा. कळंब चौक यानी शिवनेरी संघाचे आकाश सुरेश सोगे (२३) रा. सत्यनारायण ले आऊट व अन्य खेळाडूसोबत वाद केला. त्यानंतर बॅट व स्टम्पने बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेने पोस्टल मैदानावर खेळाडू सैरावैरा पळाले. या घटनेने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच आरोपी खेळाडू तेथून पसार झाले. घटनेनंतर पोलिस ठाण्यातही जमावाने गर्दी केली होती. आकाश सोगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपीविरूद्घ एसआरसीसी संघाच्या १२ ही खेळाडूविरुद्घ भादंवि कलम १४३, १४७,१४८, १९९, ३२३,५०४,५०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला.









