
चेन्नई- तामिळनाडूतील दिंडीगल जिल्ह्यात पहाटे साडेतीन वाजता क्वालीसने टँकरला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात नऊ जण ठार झाल्याचे वृत्त आहे.क्वालीस आणि टँकरची समोरासमोर धडक झाली. कोडाई कॅनल येथील एका रिसॉर्टमधून परत येत असताना हा अपघात झाला. या गाडीत १० जण होते. त्यापैकी नऊ जण ठार झाले असून जबर जखमी झालेल्या एकास जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.









