क्षतीग्रस्तांचे सर्वेक्षण करा; काँग्रेसची मागणी

DSC_1630
यवतमाळ – जिल्ह्यात गारपिट व विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडला. त्यामुळे गहु, हरभरा, मका, संत्रासह अन्य पिकाचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचे सर्वेक्षण करुन तातडीने मदत करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे.
जिल्ह्यात गारपिट होऊन पिकासह घराची पडझड, मृत जनावर, रस्ते, पुल, विद्युत पोलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासन आचार संहिता व निवडणूक प्रक्रीयेत व्यस्त आहे. प्रशासनाने जिल्ह्यातील नैसर्गिक क्षतीग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमेटीने केली आहे. जिल्हाधिकाºयांना निवेदन देतांनी आ. नंदिनी पारवेकर, जिल्हा परिषदचे विरोधी पक्षनेता देवानंद पवार, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मांगुळकर, अ‍ॅड. सिमा तेलंगे, योगेश पारवेकर, सिमा देशभ्रतार, मिनाक्ष्ज्ञी राऊत, आर्णी पंचायत समितीचे सभापती राजू विरखेडे, सोनबा मंगाम, अर्चना कोडापे, वैयजंती उगलमुगले, गोदावरी वगारे, उषा दिवटे, मंगला नंदुरकर, विणा नागदिवे, कमल राऊत, मिना सरतापे, मोहीनी गौर, हरिभाऊ जिभकाटे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


five + 6 =