
यवतमाळ, दि. २५ – खातेदारांची नऊ लाखाने फसवणूक केल्याची घटना महागाव येथे घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी कोळते पाटील मल्टी स्टेट सोसायटीच्या अध्यक्षासह १३ जणाविरुद्घ गुन्हे नोंद केले आहे.
श्रीधर कोळते रा. हातगाव यांनी महागाव येथे कोळते पाटील मल्टी स्टेट सोसायटी शाखा उघडली आहे. शाखेत गंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने अध्यक्ष व संचालकांनी खातेदारांना व्याजाचे आमिष दाख्विले. इतर बँक व सोसायटीच्या तुलनेत व्याजदर जास्त मिळत असल्याचे पाहून अंनता नागरगोजे (४५) रा. महागाव यांच्यासह असंख्य नागरीकांनी सोसायटीमध्ये गुंतवणूक केली. दरम्यान सोसायटीतून रक्कम काढण्यासाठी गेले असता, त्यांना टाळाटाळ करण्यात आल्याने अध्यक्ष व संचालक मंडळाने आपली फसवणूक केल्याचे खातेदारांच्या लक्षात आले. ८ लाख ९४ हजार ६६० रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार महागाव पोलीस स्टेशनला देण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.









