खुनातील आठ आरोपींना जन्मठेप

images4
यवतमाळ, दि. २६ – ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सावर येथील एका युवकाचा शारदार शस्त्राने वार करून खुन केल्याप्रकरणी आठही आरोपींना जन्मठेप व पाच हजार रुपये दंड ठोठावला. जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश डि.व्ही. ठाकरे यांनी आज गुरुवारी हा निकाल दिला. राजू दुर्गाप्रसाद गुप्ता (४०), गेंदलाल दुर्गाप्रसाद गुप्ता (४६), जावेद शहा बशीर शहा (३२), शेख हमीद शेख अफजल (३३), अब्दुल राशीद शेख अफजल (३३), मुस्ताक शहा मदार शहा (३८), फरहान शहा मुक्कदर शहा (२८), शेख लालु शेख अप्पु कुरेश (२८) सर्व रा. सावर अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहे.
१० नोव्हेंबर २०११ रोजी मृतक अजय उर्फ केटू स्वरुपसिंग चव्हाण रा सावर याच्यासोबत आरोपी राजू याने माझ्या घरा समोर शिवीगाळ का केली या कारणावरून वाद केला. त्यानंतर राजूने आपल्या जवळील धारदार शस्त्राने अजयच्या गळ््यावर वार केले. तर उर्वरीत सातही आरोपींनी धारदार कुºहाड, चाकु, लोखंडी पाईप यासह अन्य शस्त्रांनी वार केल्याने अजय जागीच ठार झाला. या घटनेचा प्रत्यक्षदर्शी मृतकचा भाऊ विजय चव्हाण याने यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. आरोपींनी संगणमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून धारदार शस्त्राने खुन केल्याचे नमुद केले होते. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम १४३, १४७,१४८, १४९, ३०२, ३४१, १२० (ब), ४/२५ आर्म अ‍ॅक्ट, १३५ मुंबई पोलीस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बाळू गायगोले यांनी आरोपींना अटक करून त्याच्याकडील शस्त्र जप्त केले व तपास पुर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश डि.व्ही. ठाकरे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुणावनी पार पडली. यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने प्रत्यक्षदर्शी फिर्यादी विजय चव्हाण, साक्षीदार राजू व्यास, वैद्यकीय अधिकारी त्रिशुल पडोळे, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बाळू गायगोले याच्यासह एकुण १२ जणांची साक्ष तपासण्यात आली. यामध्ये दोष सिद्घ झाल्याने आठही आरोपींना जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने पि.व्ही. गाडबैले यांनी काम पाहीले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− three = 6