खून करून प्रेत नदीत फेकले, मृतक वर्धा जिल्ह्यातील

download (2)
यवतमाळ, दि. १० – वर्धा जिल्ह्यातील इसमाचा खून करून प्रेत वर्धानदीपात्रात फेकण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली. हरिदास नारायण भोयर (४८) रा.अंदोरी जि.वर्धा, असे मृताचे नाव आहे.
कळंब तालुक्यातील चिंचोली गावाला लागून वर्धा नदी आहे. आज सकाळ दरम्यान एका इसमाचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. या घटनेची माहिती गावात पसरताच खळबळ उडाली. प्रभारी ठाणेदार सूर्यकांत राऊत यांना घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकासह घटनास्थळ गाठले. त्यानंतर मृतकाची ओळख पटली. मृतकाच्या डोक्यावर, कानावर व मानेवर शस्त्राने वार केल्याच्या खुना आहेत. अज्ञात आरोपीने शस्त्राने वार करून प्रेत नदीपात्रात फेकल्याचा कयास पोलिसांनी बांधला आहे. दुपारी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 6 = thirty six