
दिग्रस, दि. २२ – इसमाचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून विहिरीत फेकल्याची घटना मोख येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख अद्यापही पटली नसून, दिग्रस पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंद करून अज्ञात मारेक्याचा शोध सुरू केला आहे.
तालुक्यातील मोख शिवारात असलेल्या विनोद नारायण चव्हाण यांच्या शेतातील विहिरीमध्ये पोत्यात मृतदेह बांधून असल्याचे ग्रामस्थांना आढळून आाले. त्यानंतर पोलीस पाटील प्रल्हाद चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिग्रस पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतदेहाची ओळख पटली नसून, हा घातपाताचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. इसमाची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अज्ञात मारेकºयाने मृतदेह पोत्यात बांधून विहिरीत फेकला असावा, असा तर्क पोलिसांनी लावला असून, याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मारेकºयाचा शोध घेण्यासाठी चौफेर तपास सुरू केला असून, या खुनाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान दिग्रस पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनजंय जगदाळे करीत आहे.









