खैरलांजी-मुंबई अँटिकास्ट बाइक मार्च

index.jpeg11
नागपूर – राज्यात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी सत्यशोधक जनआंदोलनाच्यावतीने ५०० बाइकस्वारांचा खैरलांजी ते मुंबई असा ‘अँटिकास्ट बाइकर्स मार्च’ १८ ते २६ जूनदरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
दलितांवरील अत्याचार थांबिवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. ग्रामीण भागात दलितांमध्ये कमालीची असुरक्षिततेची भावना आहे. दलितांनी आत्मसुरक्षेसाठी सज्ज व्हावे व हे अत्याचार थांबावे, जेथे अत्याचार होत असतील तेथे धावून जावे यासाठी हे बाइकर्स सज्ज होणार आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सत्यशोधक बाइकर्स नावाने टीम गठीत करण्यात येणार आहे. खैरलांजीतून बुधवारी (ता. १८) सकाळी ८ वाजता बाइकर्स पुढील प्रवासासाठी निघणार आहेत. हा मार्च भंडारा -नागपूर-कारंजा-तिवसा-अमरावती-अकोला-मूर्तिजार-वाशीम-देऊळगावराजा-अंबड-गेवराई-औरंगाबाद-अहमदनगर-खरडा-शिरुर-पुणे-खोपोली-पनवेल मार्गे २६ जून रोजी मुंबईत पोहोचणार आहे. १३०० कि.मी.चा हा प्रवास आहे. २४ जून रोजी अहमदनगर जिल्ह्यातील खरडा येथे ‘खरडा पार्लमेंट’चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दलितविरोधी अत्याचारांवर प्रकाशझोत टाकणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुंबईत २६ रोजी मार्चच्या समारोपप्रसंगी ‘चैत्यभूमी डिक्लेरेशन’ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. परिवर्तन कार्यकर्त्यांनी या बाइकर्स मार्चमध्ये सहभागी होण्याचे आवाहन किशोर जाधव, शैलेद्र सोनवणे, देवेंद्र इंगळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 8 = nine