गतिमान कारभारासाठी सेवा हमी विधेयक आणणार – मुख्यमंत्री फडणवीस

1414595499devendra-fadnavis
मुंबई – जनतेची कामं वेळेत व्हावी यासाठी राज्यात सेवा हमी विधेयक आणू अशी घोषणा राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्याची गेल्या १५ वर्षात विस्कटलेली घडी नीट बसवून महाराष्ट्राला नंबर वन बनवू असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.
शपथविधी सोहळ्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला. यापूर्वीही अनेकदा पत्रकार परिषद घेतल्या पण आज थोडे दडपण जाणवतंय असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जनतेला पारदर्शी, गतिमान सरकार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करु.  जनतेला कामांसाठी सरकारी कार्यालयाच्या फे-या माराव्या लागू नये यासाठी सेवा हमी विधेयक राबवणार अशी घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. या विधेयकामुळे जनतेला ठराविक वेळेत त्यांची कामं पूर्ण करुन घेण्याचा अधिकार मिळेल असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


5 × = five