गळा दाबुन युवकाचा खून, बारमालकासह दोन अटकेत

crimne 6
पांढरकवडा (यवतमाळ) –  येथील एका बिअर बारमध्ये काम करणाºया युवकाचा गळा दाबुन खून केला. शवविच्छेदन अहवालाने या घटनेचे गुढ उलगडे असून बारमालकासह दोन जणांना अटक केली.
कपिल गजानन ढाले रा. देवधरी असे मृतकाचे नाव आहे. १४ जून रोजी गंभीर अवस्थेत यवतमाळ येथे रुग्णालयात दाखल केल्यानंतर कपीलचा मृत्यू झाला होता. गजानन ढाले यांनी पोलिसात तक्रार देऊन घातपात झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान नुकताच शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून कपिलचा गळा दाबुन खून केल्याचे नमुद केले आहे. त्यावरून पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवुन बिअर बार मालक प्रतीक बोरले व नोकर संदिप बोबडे या दोघांना ताब्यात घेतले. बोरले याच्या बिअर बारवर कपिल हा कामाला होता. चार दिवसापासून  तो कामावर जात नसल्याने दोघांनी त्याला मारहाण केली होती. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्याला पांढरकवडा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन यवतमाळ येथे हलविले होते. मात्र दुसºया दिवशी त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी शवविच्छेदन करुन अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान नुकताच शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून कपिलचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे नमुद केले. त्यावरुन पोलिसांनी आरोपीविरुद्घ भादंवि कलम ३०२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. अधिक तपास साहायक पोलीस निरीक्षक राखी गेडाम, पोलीस उपनिरीक्षक मडावी करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 + nine =