गारपिटीने जिल्हा गारद

DSC02472 DSC02492
यवतमाळ – जिल्ह्यात सतत अवकाळी पाऊस सुरू असून आज पुन्हा दारव्हा, नेर तालुक्यात गारपीट झाली. या गारपीटीमुळे शेतकºयांच्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले.
नेर तालुक्यात सायंकाळ दरम्यान जोरदार पावसाला सुरूवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सारंगपूर येथे गारपीट झाल्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यापूर्वी झालेल्या गारपीटीमुळे रब्बी हंगामातील गहू, हरबरा पिकांचे नुकसान झाले असताना झालेल्या गारपीटीमुळे या नुकसानीत वाढ झाली आहे. महामार्गावरील झाडे उन्मळून पडल्यामुळे काही ठिकाणची वाहतूक खोळंबली होती. तर दारव्हा तालुक्यातील लाख (खी.), चाणी, कामठवाडा, शेलोडी, जांभोरा येथे गारपीट झाली. तसेच किन्ही वळगी, सायखेडा, खेड,आदी महागाव सर्कलमधील गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले. हातणी येथे तिसºयांदा गारपीटीचा तडाखा बसला. बोरी अरब येथे वादळी वाºयामुळे झाडे उन्मळून पडली होती. तर अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली. झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. रब्बी हंगामातील गहू, हरबरा या पिकासह संत्रा बागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लाडखेडसह जांभोरा येथे गारपीट झाल्यामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर वीज खांब वाकल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. कळंब तालुक्यातील मार्कंडा येथे सतत १ तास झालेल्या गारपीटीमुळे शेतीपिकांसह घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वाºयासह झालेल्या गारपीटीमुळे शेकडो नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली होती. जीव वाचविण्यासाठी नागरिकांनी मुलाबाळांसह बाजीच्या खाली आसरा घेतला होता. अनेक वृक्ष उन्मळून पडली तर वीज खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता. गारपीटीमुळे काही महिला पुरुष जखमी झाल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 2 = seven