गुराख्याचा गळयावर फिरवला चाकु

index
सावळी सदोबा  – जंगलात गुरे ढोरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याच्या गळ््यावर चाकु फिरवून प्राणघातक हल्ला केल्याची  घटना  बुधवारी दुपारी येळशी येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पांढरकवडा येथील उपविभागीय पोलिस अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
धर्मानंद देवतळे (५०) रा. नामापुर तांडा असे गुराख्याचे नाव आहे. गावातील नागरिकांच्या गायी चारण्यासाठी तो येडशी येथील जंगलात गेला होता. अशातच एका अज्ञात व्यक्तीने अचानक धर्मानंदच्या गळ््यावर धारदार चाकु फिरवला. तसेच हातावर व बरगडीवरही चाकुने सपासप वार केले. जखमी अवस्थेत गुराखी येडशी या गावापर्यंत आले. त्यांनी हा प्रकार तेथील नागरिकांना सांगताच त्याला एका वाहनाने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. हल्ला चढविणारा आरोपीने याच जंगलात गुरे चारणाºया दोन गुराख्यांना धर्मानंद बद्दल विचारणा केली होती. या प्रकरणाची तक्रार जगन्नाथ देवतळे (६६) यांनी पारवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन ठाणेदार पंजाब वंजारी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनास्थळावरून चपला व अन्य साहित्य जप्त केले. दरम्यान आज पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुराख्यावर कोणी व का हल्ला चढविला हे अजुनही उघड झाले नसून पोलिस आरोपीचा कसुन शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


seven + 2 =