गृहविभागाकडून पोलिसांची थट्टा, अधिकाºयांना गुलाब जामुन, शिपायाला वटाणे भात

IMG-20141205-WA0069_resizedIMG-20141205-WA0071_resized
नागपूर (विशेष प्रतिनिधी)- हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी वर्ध्या येथून  नागपूरला आलेल्या पोलिस हवालदार-चालक सुधाकर गंथळे यांचा थंडीने गुरूवारी मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्य सरकारने सदर पोलिसांना सोई सुविधा पुरविण्याचे आदेश गृह विभागाला दिले आहे. त्यावरून बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना चारद व ब्लॅकेट वाटप केल्या. तसेच नास्त्याची व्यवस्थाही करण्यात आली. यामध्ये अधिकाºयांसाठी गुलाब जामुन, पोहे, समोसाची व्यवस्थ केली. तर पोलीस शिपायांना मसाला भात असा दुजाभाव करण्यात आला. चक्क गृहविभागाकडूनच पोलिसांचाची थट्टा केली आहे.
८ डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरूवात होणार आहे. २६ डिसेंबर पर्यंत चालणाºया या अधिवेशनासाठी विदर्भातून पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना बंदोबस्तासाठी तैनात केले आहे. गुरूवारी वर्धा येथील सुधाकर गंथळे या पोलीस कर्मचाºयांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलिसांच्या व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने उपाययोजना करण्याचे आदेश गृह विभागाला दिले. त्यावरून नागपूर येथे तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना ब्लॅकेट व चादरचे वाटप केले. तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाºयांसाठी नास्ता व भोजनाची व्यवस्था केली आहे. पोलीस अधिकाºयांसोबत शिपायी खांदाला खांदा लाऊन रात्र अन्  दिवस कर्तव्य पार पाडत आहे. मात्र तेथे पोलीस अधिकाºयांसाठी गुलाब जामुन, चमचम, पोहे, समोसे आदी मेनु ठेवला. तर पोलीस शिपायांसाठी फक्त मसाले भात देण्यात आला. त्यामुळे पोलिसांमध्ये नाराजी असून गृह विभागनेच थट्टा चालविल्याचे बोलल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


three + 6 =