गॅस टँकरला अपघात

tanker-engulf

ठाणे – सुरतहून तळोजाच्या दिशेने जाणा-या अमोनिया गॅसच्या टँकरला रविवारी सकाळी अपघात झाला. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर वायूगळती झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
मुंब्रा बायपासजवळ तब्बल १४५० टन अमोनिया गॅसने भरलेला एक टँकर पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास कोसळला. टँकरचा व्हॉल्व निघाल्याने वायूगळती सुरु झाली. सुरक्षेचा उपाय म्हणून सैनिकनगर, कौसा भागातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.अपघाताचे वृत्त कळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान व आपत्कालीन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु आहे. या अपघातामुळे या मार्गावर वाहतूकीची कोंडी झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− 7 = one