
एकवर्षापासून अत्याचार, नराधमास अटक
यवतमाळ – समलैंगिक सबंधाचा मुद्दा सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालामुळे देशात सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असतानाच पित्याचे ‘गे’ (समलैंगिक) सबंध असणाºया पुरुषाकडून पंधरा वर्षीय बालीकेचे तब्बल एक वर्षापासून लैंगिक शोषण झाल्याची खळबळ जनक घटना आज येथे उघडकीस आली. विभक्त राहणाºया या मुलीच्या आईनेच सदर प्रकाराची पोलिसात तक्रार केल्याने अत्याचार करणाºया नराधमास अटक करण्यात आली आहे.
समलैंगिक सबंध हा गुन्हाच आहे यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करून काही महिने सुद्घा उलटायचे आहेत. या पार्श्वभूमिवर शहरातील एका उच्च मध्यमवर्गीयांच्या सोसायटीत हा प्रकार गत वर्षभरापासून सुरु होता. या नगरात एक मध्यमवर्गीय कुटुंब असून कुटुंबप्रमुख समलैंगिक सबंध ठेवणारा असल्याचे या घटनेतून उघडकीस आले आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहिती नुसार या कुटुंबाच्या घरी काही वर्षापूर्वी शहरात चहा टपरी चालविणारा एक व्यक्ती भाड्याने राहायला आला. कालांतराने घरातील कुटुंब प्रमुखाने कॅन्टींग चालकाला विश्वासात घेऊन त्याच्याशी समलैगिंक सबंध प्रस्थापित केले. एकांतात कुटुंबाना भनकही लागु न देता ती दोघे सबंध ठेवायचे. एक दिवस हा किळसवाणा प्रकार त्या कुटुंबप्रमुखाच्या पत्नीस माहित झाला. त्यातून वाद उत्पन्न होऊन ती घर सोडून निघुन गेली. तिच्या या निर्णयामुळे मात्र एक मुलगा व एक मुलगी या दोन्ही अपत्यांना आई-वडीलापासून दुर राहावे लागले. काही दिवसानंतर मुलगा आईसोबत व मुलगी पित्यासोबत राहत होती. ही अल्पवयीन मुलगी आपल्या पित्याच्या समलैंगिक सबंधापासून अनभिज्ञ होती. सबंधित कॅन्टींग चालकाला तर त्या कुटुंब प्रमुखाची पत्नी निघुन गेल्याने मोकळे रानच मिळाले होते. समलैंगिक सबंध ठेवता-ठेवता त्याची विकृत नजर त्या १४ वर्षीय बालिकेवर गेली. त्यातून या मुलीच्या अगतिकतेचा लाभ उठवित त्याने तीचे जबरदस्तीने लैंगिक शोषण सुरु केले. या प्रकाराची वाच्यताही सबंधित बालीकेला करता न आल्याने तब्बल एक वर्षापर्यंत ती निमुटपने हा अत्याचार सहन करत होती. मात्र अत्याचार करणाºयालाही मर्यादा असतात त्याच प्रमाणे तीच्याही सयमांचा बांध फुटला. नवरा व मुलीला सोडून परठिकाणी राहणारी मुलीची आई सहाव्या वर्गात शिकणाºया आपल्या मुलीला भेटायला म्हणून शाळेत गेली. त्यावेळी या मुलीने घडणारा अत्याचार न सांगता केवळ मी वडीला सोबत राहत नाही मला घेऊन चल एवढे म्हटले. त्यावरून आईने या मुलीला ६ फेबु्रवारीला आपल्या सोबत नेले. मात्र घडलेल्या अत्याचाराने या मुलीच्या चेहºयावर सततचा तणाव आईला दिसून आला. त्यामुळे या मुलीला आईने तु तणावात का राहतेय, म्हणून विचारणा केली. तेव्हा मानसिक दडपणात असलेल्या मुलीने अत्याचाराला वाचा फोडली. हा प्रकार ऐकुन हादरलेल्या तीच्या आईने शहर पोलीस ठाणे गाठून या घृणास्पद प्रकाराची तक्रार बुधवारी दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी सुनिल रा. बाभुळगाव ह.मु. यवतमाळ याच्याविरूद्घ भादंवि कलम ३७६ (आय) (एन), ५०६ सह कलम ४,६ बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. अधिक तपास शहरचे ठाणेदार अरुण आगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तेजस्वीणी गिरसावळे करीत आहे.
(साभार , दै. पुण्य नगरी )









