गोहत्येप्रकरणी पहिला गुन्हा

images
नाशिक – महाराष्ट्र सरकारनं गोकायदा वंशहत्या बंदीचा लागू केल्यानंतर या कायद्यांतर्गत नाशिक जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगावच्या आझाद नगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात या गुन्ह्याची नोंद झाली असून दोन गायींच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर आहे. आरोपींच्या दुकानातून १५० किलो मांसही जप्त करण्यात आलं आहे.

मालेगावातील एका दुकानात गायीच्या मांसाची बेकायदा विक्री सुरू असल्याची तक्रार बुधवारी संध्याकाळी आझाद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्याकडे आली. ही माहिती मिळताच पोलिसांचे पथक संबंधित दुकानावर पोहोचले. पोलीस आल्याचे समजताच दुकानवाले पळून गेले. स्थानिकांच्या चौकशीनंतर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.
गोवंश हत्या बंदी कायद्यानुसार गाय, बैल, वळू यांची हत्या करण्यावर बंदी आहे. गोवंशाची हत्या हा अजामीनपात्र गुन्हा असून त्यासाठी पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजारांच्या दंडाची तरतूद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ five = 14