ग्रामपंचाय सदस्य एसीबीच्या जाळ््यात

Chirde, Digras 01
दिग्रस (तालुका प्रतिनिधी) – अंगणवाडीचे बांधकाम सुरळीत सुरू ठेवण्यासाठी फेट्री ग्रामपंचायतच्या सदस्याला दहा हजार रुपये लाच स्विकारली. येथील मानोरा चौकातील बाजोरीया हॉटेलमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कार्यवाही केली.
रामकृष्ण भुंजगा धनगर (५५)असे ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. फेट्रा ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडीचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकामाबाबत तक्रारी न करणे,  केलेली तक्रार मागे घेणे व बांधकाम सुरळीत चालु ठेवण्याकरीता धनगर यांनी दहा हजाराची लाच मागितली होती. त्यामुळे बांधकामाची जबाबदारी असलेल्या व्यक्तीने यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून आज पथकाने येथील मानोरा चौकातील बाजोरीया हॉटलमध्ये सापळा रचला. यावेळी ग्रामपंचायत सदस्याने दहा हजार रुपये स्विकारून पॅन्टच्या खिशात टाकले. यावेळी तक्रारकर्त्याने इशारा करताच सदर पथकाने सदस्याला अटक केली. ही कार्यवाही पोलीस उपअधिक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हेकर, नंदकुमार जामकर, अरुण गिरी, प्रकाश शेंडे, गजानन राठोड, शैलेश ढोणे, अमित जोशी, अनिल राजकुमार, विशाल धलवार, अमोल महल्ले, निलेश पखाले, सुधाकर मेश्राम, भारत चिरडे, किरण  खेडकर, नरेंद्र इंगोले यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


four − 3 =