
यवतमाळ, दि. १२ – येथील डेहनकर ले-आऊटमध्ये घरफोडी करणाºया दोन महिलांना डिवायएसपीच्या पथकाने आज गुरूवारी अटक केली. त्यांच्या कडून ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गीता अर्जून भोसले (३०) रा. परसोडी, हल्ली मुक्काम कळंब, अनिता माउली भोसले (२०) रा. वर्धा व दोन अल्पवयीन मुले असे अटकेतील चोरट्यांची नावे आहे.
ब्रिजलाल छोटेलाल यादव रा. डेहणकर ले-आऊट यांच्या घराचे दरवाजाचे कुलूपकोंडा तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख असा ६४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी वडगावरोड पोलीस स्टेशनला तक्रार नोंद झाल्यानंतर पोलीस चोरट्यांचा शोध घेत होती. दरम्यान आज सकाळी चोरीतील कोºया नोटा दोन महिलांकडे असल्याची माहिती डीवायएसपीच्या पथकाला मिळाली. त्यांनी चौकशी केली असता, रोख रक्कम व चोरीतील मुद्देमाल महिलांकडे मिळाला. पथकाने दोन महिलांसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांना वडगावरोड पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. या महिलांनी वर्धा येथून अॅक्टीव्हा दुचाकी वाहनाची चोरी केल्याची कबूली सुद्घा पथकापुढे दिली असून, दुचाकी वर्धेत असल्याचे सांगितले. याबाबत वर्धा पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली आहे. हि कारवाई डिवायएसपी राहुल मदने, संतोष मडावी, प्रमोद मडावी, इकबाल शेख, रूतूराज मेढवे, विजय जाधव आदींनी केली.









