

यवतमाळ, दि. १८ (विशेष प्रतिनिधी) – कुटुंबीयानी लग्नाला विरोध केल्याने प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी १८ जानेवारी रोजी सकाळी घाटंजी तालुक्यातील घाटी येथे उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुवर्णा भास्कर नारनवरे (२१) रा. बेलोरा , श्रीकांत अवधुत डगमल (२५) रा. घाटी घाटंजी असे मृतक प्रेमीयुगुलाचे नाव आहे. सुवर्णा ही घाटंजी येथील गिलाणी महाविद्यालयात बि.ए.भाग एक ची विद्यार्थीनी होती. तर श्रीकांत हा सेन्ट्रींगचे काम करीत असून युवती त्याची मामेबहीण होती. नातेवाईक असल्याने दोघांचेही एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. अशातच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांनी साथ जीयेंगे साथ मरेंगेची शपथ घेतली होती. अशातच त्यांनी आपल्या कुटुंबीयाना लग्न करुण देण्याची मागणी केली होती. यावेळी नातेवाईकांनी लग्नास विरोध केला होता. दरम्यान नारनवरे कुटुंबीयांनी सुवर्णासाठी विवाहयोग्य वर शोधणेही सुरू केले होते. त्यामुळे त्या दोघांनीही आपली जीवनयात्रा संपविण्याच निर्णय घेतला . काल रात्री त्यांनी ओळणीने एकमेकांना बांधून गुरांचा बाजार भरत असलेल्या परिसरातील विहीरीत उडी टाकुन आत्महत्या केली. दरम्यान आज सकाळी ते दोघेंही घरी न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर विहीरीत मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती मिळतााच घाटंजी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामण रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून बेलोरा व घाटी घाटंजी परिसरात खळबळ उडाली आहे.









