घाटी येथे पाच लाखाची घरफोडी

घाटंजी – चोरटयाने बंद घर फोडून पाच लाखाचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना सोमवारी रात्री घाटी (घाटंजी) येथे घडली. मोहम्मद आसिफ अब्दुल रसीद हे आपल्या कुटुंबीयासह मोठ्या वडीलाचा मृत्यू झाल्याने अत्यसंस्कारासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने मोहम्मद आसिफ याच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व एक लाख रुपये रोख असा एकुण पाच लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला. गावावरून परत आल्यानंतर हा प्रकार त्याच्या निदर्शनास आला. याप्रकरणी घाटंजी पोलिसांनी आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल केला. अधिक तपास पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अनिल पुरळकर करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


five × = 35