चाकुने कापला पत्नीचा गळा,पतीचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

 

महागाव – शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून माहेरी गेलेल्या पत्नीच्या गळ््यावर चाकुने वार करुन खून केल्याची घटना थरारक घटना दहिवड येथे २ मे रोजी दुपारी घडली. यावेळी घटनास्थळावरून पतीने पळ काढून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने गावामध्ये चांगलीच खळबळ उडाली असून संताप व्यक्त होत आहे.

माया बळवंत राठोड (२४) रा. दहिवड असे मृतक महिलेचे नाव आहे. दोन वर्षापूर्वी महागाव तालुक्यातील घोनसरा येथील पवन बिलो राठोड (२४) या युवकासोबत तीचा विवाह झाला होता. सुखी संसार सुरु असतानाच पतीसह सासरच्यानी माहेरवरुन एक लाख रुपये आणयाच्याचा तगादा लावला होता. यावेळी तीचा शारीरीक व मानसिक छळ करुन मारहाण करणेही सुरु केले होते. सतत होणाºया त्रासाला कंटाळून सहा महिन्यापूर्वी ती आपल्या मुलाला घेऊन दहिवड येथे येऊन वडीलांकडे राहत होती. दरम्यान पेंढी येथील दौलत नाईक यांच्या समक्ष पती पत्नीची बैेठक बोलावुन समेट घडवून आणला. यावेळी मायाला फारकत देऊन मुलगा अभिमन्यु याच्या नावावर आठ दिवसात तीन एकर शेती  करण्याचे ठरले होते. लाखो रुपयाची शेती मुलाच्या नावाने करावे लागणार असल्याने पनव संतप्त झाला होता. त्यामुळे त्याने पत्नी मायाला कायमचे संपविण्याचा निर्णय घेतला. २ मे रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास एम.एच. २७ / झेड ४६४८ क्रमांकाच्या दुचाकीने तो दहिवड येथे आला. त्यानंतर महत्वाचे बोलायचे आहे असे सांगून मायाला तीच्या काकाच्या घरात नेले. यावेळी आतमधून दाराची कडी लावुन सोबत आणलेल्या चाकुने पत्नी मायाच्या गळ््यावर सपासप वार केले. यावेळी किंचाळीत रक्ताच्या थोळ््यात ती खाली पडताच पवनने तेथून काढता पाय घेत मनोहर पवार याच्या दुचाकने फरार झाला. काही वेळानंतर त्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर पुसद येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन प्रकृती चिंताजनक असल्याने यवतमाळ येथील रुग्णालयात हलविले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पवन राठोड याच्याविरुद्घ खूनाचा गुन्हा दाखल केला.

घटनेच्या दिवशी आरोपीचे नातेवाईक बिल्लु राठोड, विमल राठोड, पिंटु राठोड, जयश्री राठोड, सर्वेश राठोड, रंजना राठोड, नारायण पवार, वनिता पवार हे दहिवड येथील दिगांबर बदु चव्हाण याच्या मुलीच्या लग्नाला आले होते. त्याचाही या घटनेत सहभाग असल्याचा संशय व्यक्त करत त्याच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली होती. अन्यथा शवविच्छेदन होऊ देणार नाही असा इशारा दिला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आरोपी प्रती रोष व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


9 − seven =