चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून

यवतमाळ  – वडगावजंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाºया चिचघाट येथे एका इसमाने सुरीने वार करून पत्नीचा खून केल्याची घटना दसºयाच्या दिवशी ३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.
अनिता विजय राठोड (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. १९९५ मध्ये आरोपी विजय नारायण राठोड (४३) रा. किन्हाळा याच्यासोबत तिचा विवाह झाला असून तीन मुले आहेत. विजय हा पत्नी अनिताच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत सतत वाद करीत होता. २ आॅक्टोबर रोजी भावाच्या मुलाचा जावळे काढण्याचा कार्यक्रम असल्याने ती तिन्ही मुलांना घेऊन माहेरी चिचघाट येथे आली होती. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर दसºयाच्या दिवशी आरोपीने पत्नीला घरी चालण्याची विनंती केली. मात्र तिने नकार दिल्याने तो एकटाच किन्हाळा येथे परत गेला. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता तो चिचघाट   येथे आला आणि झोपून असलेल्या पत्नी अनिताच्या छातीवर व बरगडीवर सुºयाने सपासप वार करून गंभीर जखमी केले. यावेळी नातेवाईकांनी तिला यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाला. या घटनेची वार्ता गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळासह रुग्णालयात धाव घेतली. पुनाजी सवाई जाधव (६५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडगाव जंगल पोलिसांनी आरोपी विजय राठोड याच्याविरूद्घ भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक गजानन खारडे यांनी तपासचक्रे फिरवून आरोपीस अटक केली. त्याला न्यायालयात हजर करून ६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळवून या घटनेत वापरेला सुरा जप्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 − = zero