चार नगर परिषदमध्ये सभापतींची निवड

555
यवतमाळ, दि. २० – आर्णी नगर परिषदेसाठी विषय समिती सभापतींची निवड प्रक्रीया आज पार पडली. कॉंग्रेसचे बहुमत असलेल्या नगर परिषदेत जैसे थे स्थिती ठेवून एक वर्ष पूर्ण झालेल्या सभापतींना पुन्हा संधी देण्याचा निर्णय शिवाजीराव मोघे यांनी घेतला. नगराध्यक्ष आरीज बेग, कॉंग्रेसचे गटनेते अनिल आडे व शिवसेनेचे गटनेते प्रवीण मुनगीनवार यांनी संयुक्तरित्या सर्व सभापतीसह समिती सदस्यांची यादी अध्यासी अधिकारी म्हणून कामकाज पाहणारे उपविभागीय अधिकारी नरेंद्र टापरे यांच्याकडे दिली.
अविरोध व शांततापूर्ण झालेल्या या निवडीत उपाध्यक्ष निता ठाकरे यांची शिक्षण, नियोजन व विकास समितीपदी पदसिद्ध सभापती म्हणून तर शाईन अनवर पठाण सार्वजनिक बांधकाम सभापती, गणेश हिरोळे आरोग्य सभापती, श्रावण किसन मडावी पाणीपुरवठा सभापती, गौसिया अक्रम शहा महिला व बालकल्याण सभापती व अनिता भगत यांची महिला व बालकल्याण उपसभापतीपदी निवड करण्यात आली. यावेळी प्रभारी मुख्याधिकारी अशोक गराटे उपस्थित होते.
उमरखेड नगर परिषद
उमरखेड- येथील नगर परिषदेच्या विषय समिती सभापतीपदाची निवडणूक खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली. उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण मानकर आणि नगराध्यक्षा उषा आलट यांच्या प्रमुख उपस्थितीत विषय समित्यांची निवड प्रक्रिया पार पडली.
पाणीपुरवठा सभापतीपदी बालाजी देशमुख, अरोग्य सभापतीपदी बालय्या दुर्गमवार शिक्षण सभापतीपदी गटनेते नंदकिशोर अग्रवाल, बांधकाम सभापती नगरसेविका वंदना धाडगे, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी रंजना लांबटीळे आणि नियोजन समितीचा कारभार उपाध्यक्षा नजमाबी दौलत खान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सत्ताधारी गटाने बांधकाम व पाणीपुरवठा या विषयाच्या सभापती पदावर बदलुन दोन नव्या चेहºयांना संधी देण्यात आली. विषय समित्या निवडीसाठी सभागृहात नगरसेवक संतोष जैन, शैलेंद्र मुंगे, भारत खंदारे, रामराव भुरके, साजीद जहागीरदार इनायत उल्ला खान, चंद्रशेखर जयस्वाल, सुरेश माहेश्वरी, माजी नगराध्यक्ष अर्चना नाईक, लक्ष्मी ठाकरे, गौसिया बेगम अहेमदखान, हुमेरानाज रिफत अन्सारी, पुष्पा चव्हाण उपस्थित होते. सभापती निवड प्रक्रियेदरम्यान शिवसेनेचे दोन्ही नगरसेवक अनुपस्थित होते.
नेर नगरपरिषदच्या महिलाराज
नेर – नेर नबाबपूर नगरपरिषदच्या विषय व स्थायी समितीची निवडणूक पार पडली. शिवसेनेने आपले वर्चस्व याही निवडीत दाखवले असून, महिला राजने आपले अस्तीत्व कायम ठेवले.  समितीच्या अखेर आपला ठसा कायम ठेवून महिला राजचा झेंडा ठेवला. या निवडणूकीत चार जागावर महिला तर केवळ दोन जागेवर पुरूष उमेदवारांना स्थान मिळाले. मात्र अनेकांनी स्थान मिळवण्यासाठी केलेली धडपड मात्र शेवटपर्यंत कायम राहिली.
आज दुपारी ३ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी मोहन जोशी  मुख्याधिकारी अतूल पंत यांच्या उपस्थितीत स्थयी व विषय समिती सभापतीची निवड अविरोध झाली यात बांधकाम समितीपदी शालि गुल्हाणे, शिक्षण सभापती रश्मी पेटकर, आरोग्य सभापतीपदी वनीता मिसळ, महिला व बालकल्याण सभापती पदी वैष्णवी गुल्हाणे, महिला व बाल कल्याण सभापती उपसभापती माया राणे तर पाणी पुरवठा सभापती पदी मोहन भोयर इत्यादीची निवड करण्यात आली. यावेळी स्थायी समितीच्या सभापती पदी नगराध्यक्ष पवन जयस्वाल यांनी आपल्याकडे कायम ठेवले विशेष म्हणजे प्रत्येक सभापतीला आपल्या न्यायपुर्ण हक्क देण्याची बाब नगराध्यक्ष पवन जयस्वाल यांनी कायम ठेवली. यावेळी नगरसेवक संजय दारव्हटकर, विनोद जयसींगपूरे, रुपाली दहेकर, संध्या चिरडे, भाऊराव ढवळे, शकील बानो नासी, प्रतिभा बगमारे, तनविर खा पठाण, दाऊद इब्राहीम नुर, सुनिल खाडे, इरफान अकबाणी, सुभाष भोयर इत्यादी उपस्थित होते. यानिवडणूकीत शिवसेना, राकाँ किंवा कॉग्रेस उमेदवाराला संधी देईल अशी चर्चा होती. तशा पध्दतीने काही नावेही येत होती मात्र शिवसेनेने आपल्या नगर सेवकांचे संख्याबळ लक्षात घेता इतर पक्षाला स्थान दिले नाही. या नगर परिषदे मध्ये शिवसेनेचे १० व अपक्ष २ असे १२ नगर सेवकांचे संख्याबळ असून, राकाँकडे ४ तर काँग्रेसचे दोन असे संख्या बळ असल्याने शिवसेनेने आपल्या वरचस्व ठेवला.
घाटंजीत विषय समितीची निवड अविरोध
घाटंजी – येथील नगर परिषदच्या विषय समिती सभापती निवड करण्यासाठी मतदान घेण्यात आले. यावेळी सर्वच सभापतीपदासाठी प्रत्येकी एक अर्ज असल्याने निवड अविरोध झाली.
बांधकाम सभापती म्हणून अकबर तंवर, आरोग्य सभापती किशोर दावडा, महिला व बाल कल्याण सभापती इंदु परतेकी, शिक्षण सभापती संदिप बिबेकार यांची अविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय महसुल अधिकारी संदिप महाजन व प्रभारी मुख्याधिकारी विर यांनी काम पाहीले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 5 = eleven