चिंतामणी दहिहांडीसाठी लाखो भाविकांची गर्दी

2015-01-25 17.17.43
कळंब, दि. २५  –  विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया श्री चिंतामणी जन्मोत्सवानिमित्त २१ जानेवारीपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आज रविवारी आयोजीत दंहिहांडी कार्यक्रमासाठी लाखो भक्तांनी गर्दी करून दर्शन घेतले.
श्री चिंतामणी उत्सवानिमित्त शहरातून मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर दहिहांडी शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये १०० च्यावर भजनी मंडळ व दिंड्यासह लाखो भक्तांनी सहभाग घेतला होता. यामध्ये ज्ञानेश्वर भजनी मंडळ कोठा, मुंगसाजी भजनी मंउळ कळंब, शारदा भजनी मंडळ कळंब, चिंतामणी महिला भजनी मंडळ, गाडगेबाबा महीला भजनी मंडळ, मोरया भजनी मंडळ, तपेश्वर भजनी मंडळ, गुरुदेव दत्तात्र्य भजनी मंडळ, गुरुदेव भजनी मंडळ, भगतसिंग भजनी मंडळ, राणी लक्ष्मी भजनी मंडळ, जयगुरू भजनी मंडळ, गजानन महाराज भजनी मंडळ, मंगलमुर्ती भजी मंडळ, स्वामी समर्थ भजनी मंडळ याच्या अन्य मंडळाचा समावेश होता. त्याच प्रमाणे जिल्हा परिषद बेसिक शाळा, जिल्हा परिषद कन्या शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,  शिवशक्ती कन्या हायस्कुल, कनिष्ठ महाविद्यालय, गणेश विद्यानिकेतन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी महाल व राजुरा येथील विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या शोभायात्रेला चिंतामणी मंदिरापासून सुरूवात करण्यात आली. शहरातील इंदिरा चौक, राममंदिर, पोलीस स्टेशन, गांधी चौक, नेहरु चौक, तथागत नगर, गाडगेबाबा पुतळा मैदान आदि मार्गाने शोभायात्रेने मार्गक्रम केले. यावेळी तरुणांनी चौकाचौकात पिण्याचे पाणी व शरबतची व्यवस्था केली होती. यावेळी अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 2 = three