चिमुरड्याचे गुप्तांग कापले

2014-09-12~manwithknife_ns
जयपूर – कौटुंबिक वादातून १७ दिवसाच्या मुलाचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना जयपूरमध्ये घडली आहे. पिडीत मुलाच्या आईवडिलांनी या क्रूरकृत्यासाठी कुटुंबातील व्यक्तींवरच संशय व्यक्त केला असून याप्रकरणी पोलिसांनी तपासही सुरु केला आहे.
जयपूरमध्ये राहणारे  अखिल जैन हे कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. तर त्यांची पत्नी  पारुल या आंघोळीसाठी गेल्या होत्या. या दरम्यान त्यांचा १७ दिवसांचा मुलगा जोरजोरात रडू लागला. यामुळे घाबरुन पारुल बाहेर आल्या असता त्यांना मुलाचे गुप्तांग कापल्याचे आढळले. यानंतर पारुल व त्यांच्या सास-यांनी रक्तबंबाळ अवस्थेतील चिमुरड्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र मुलगा खूपच लहान असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करता येत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पाच वर्षानंतरच ही शस्त्रक्रिया करणे शक्य असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. कुटुंबातील काही जणांनी तुमचे वैवाहीक जीवनच उध्वस्त करु अशी धमकी दिल्याचे अखिल जैन यांनी पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी या आधारे तपास सुरु केला असून प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याने चौकशीनंतरच पुढील कारवाई करु असे जयपूर पूर्वच्या पोलिस उपायुक्तांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− four = 1