बिजींग – चीनच्या युनान भागातील कुनामिंग या रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री चाकूधारी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात ३३ जण ठार झाले तर १३० लोक जखमी झाले आहेत.
चीनच्या झिनुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी युनानची राजधानी असलेल्या कुनमिंग रेल्वेस्टेशनवर हल्लेखोरांनी हल्ला केला. यात ३३ प्रवाशांना आपला जीव गमावावा लागला तर १३० जण जखमी झाले आहेत. यासंबधीचे फोटो ‘सिना वेबो’ या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.हल्लेखोरांपैकी एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. मात्र मिळालेल्या पुराव्याच्या आधारे हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे.









