छत्तीसगड:नक्षली हल्ला,६ शहीद

1
दंतेवाडा – छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी गस्ती पथकाला लक्ष्य करुन भूसुरुंग स्फोट केला. या स्फोटात उपपोलिस निरीक्षक विवेक शुक्ला यांच्यासह सहा जवान शहीद आणि दोघे जखमी झाले. नक्षलवाद्यांनी पोलिसांची शस्त्रे घेऊन पळ काढला.
याच महिन्याच्या (फेब्रुवारी २०१४) सुरुवातीला दंतेवाडामध्ये पोलिसांनी पाच नक्षलवाद्यांना अटक केली होती. याआधी २०१० मध्ये दंतेवाडात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांना घेराव घालून मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ७६ जवान शहीद झाले होते. छत्तीसगड हे नक्षलवादप्रभावी राज्य आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी छत्तीसगडमध्ये हिंसक कारवाया करण्याची शक्यता गुप्तचरांनी आधीच व्यक्त केली आहे. त्यामुळे आजच्या घटनेची सुरक्षा दलांनी गंभीर दखल घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 1 = five