दिग्रस काँग्रेसची प्रचार रॅली
यवतमाळ – यवतमाळ-वाशीम लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अॅड. शिवाजीराव मोघे यांचे प्रचारार्थ आज शुक्रवारी दिग्रस येथे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीचे रुपांतर सभेत झाल्यानंतर मान्यवरांनी सभेला संबोधित केले. यावेळी काँग्रेसचे महाराष्टÑ प्रदेश अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे यांनी भाजपा व शिवसेना नेत्यांवर टिका केली.
या सभेला ना. मनोहराव नाईक, माजी मंत्री संजय देशमुख, प्रवीण देशमुख, रा.काँ. जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले, अॅड. शंकरराव राठोड, अॅड. सिमा तेलंगे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे म्हणाले की, भाजपा-शिवसेना युतीचे नेते विकास आणि शेतकरी प्रश्नावर राजकारण करतात. केवळ मोदीचे गुणगान गायील्याने सत्तेवर बसता येत नसते, अशी टिका आ. माणिकराव ठाकरे यांनी केली. यवतमाळ-वाशीम लोकसभा क्षेत्रातून काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार अॅड. शिवाजीराव मोघे यांना निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपविली आहे. मला विश्वास आहे की, आपण कामाला लागले आहे. या निवडणुकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जातीयवादी शक्तींना थारा देऊ नये, असे आवाहन यावेळी आ. ठाकरे यांनी केले. या सभेत काँग्रेस, राकाँच्या पदाधिकाºयांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.









