जिनिंगला आग; ८० लाखाचे नुकसान

DSC_2920
राळेगाव, ६ – येथील महाराष्टÑ जिनिंगला लागलेल्या आगीत ८० लाखाचा कापूस जळून खाक झाला. ही घटना आज दुपारी २.३० वाजता दरम्यान घडली.
मेटीखेडा रोडवर महाराष्टÑ जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरी आहे. आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना उघडकीस येताच परिसरातील जनतेने घटनास्थळी धाव घेतली. मात्र आग विझविण्यासाठी पुरेशा सुविधा नसल्याने यवतमाळ, वणी, देवळी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. बघता-बघता आगिने रौद्ररुप धारण केले. यवतमाळच्या अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून आगिवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा मारा केला. मात्र आग आटोक्यात आणण्यात यश आले नव्हते. वणी येथील अग्निशमन दलाचे पथक पोहोचल्यानंतर त्यांच्याकडूनही आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होता. या आगीत १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून सीसीआयचे ८० लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राळेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सोळंकी, पोलीस काँन्स्टेबल कुमरे, राजू करपते यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून वाहने बाहेर काढली. घटनास्थळी तहसीलदार सुरेश कव्हळे, प्रफुल्ल मानकर यांनी भेट दिली. या आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


5 + three =