
यवतमाळ (सूरज एम.पी.)- यवतमाळ जिल्हा परिषदेच्या परिचर पदाची भरती घेण्यात आली. परिक्षा सुरू होण्यापूर्वीच पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी आरोग्य विभागाच्या विस्तार अधिकारी विक्रम रापत याना अटक केली. दरम्यान आज जिल्हा परिषद प्रशासनाने सदर विस्तार अधिकाºयाला निलंबीत केले आहे.
जिल्हा परिषदच्या वतीने शनिवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सत्रात परिचर पदाच्या लेखी परीक्षेचा पेपर आयोजित करण्यात आला होता. काटेबाई जि.प.शाळेच्या परीक्षा केंद्रावर कर्तव्यावर असलेल्या विस्तार अधिकारी विक्रम राऊत याने पेपर सुरू होण्यापूर्वीच दुपारी २ वाजता पेपर एका युवकाच्या मार्फत कोचिंग क्लास संचालकाकडे सोडविण्यासाठी पाठविला. जगदिश पांडे हे विक्रीकर अधिकारी असून , पूर्वी कोचिंग क्लास चालवित होते. त्यामुळे राऊत याची त्यांच्यासोबत ओळख असल्याचे बोलल्या जात आहे. १ नोव्हेंबर रोजी यवतमाळ जि.प.च्या लेखी परीक्षेची उत्तरतालिका औरंगाबादमध्ये जप्त करण्यात आली होती. विक्रीकर अधिकारी, कोचिंगक्लास संचालकासह अकरा जणांना अटक करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली होती. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच परीक्षेचा पेपर बाहेर आल्याने पांडेही चकीत झाले. त्यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून लगेच पेपर घेवूनच वडगाव रोड पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून काटेबाई परीक्षा केंद्र गाठले व विस्तार अधिकाºयास चौकशीसाठी ताब्यात घेतले. या घटनेची माहिती उमेदवारांना मिळताच सर्वत्र खळबळ उडाली. रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी विस्तार अधिकाºयाची चौकशी केली. काटेबाई परीक्षा केंद्रावर विस्तार अधिकाºयाचा भाऊ परीक्षा देत होता. तो उत्तीर्ण झाला पाहिजे, या उद्देशाने हा पेपर बाहेर पाठविल्याची कबुली विक्रम राऊत याने पोलिसात दिली. त्यावरून पोलिसांनी पेपर फोडल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला. जिल्हा परिषद प्रशासनाने सदर परिक्षा रद्द केली असून विस्तार अधिकाºयावर निलंबनाची कार्यवाही केली आहे. या पेपटफुटीमध्ये आणखी कीती मासे गळाला लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









