
शहरात माथेफिरूंचा धुमाकूळ , दोन युवक ‘सीसीटीव्ही’त कैद
यवतमाळ – शहरात रविवारच्या मध्यरात्री अज्ञात दोन दुचाकीस्वार युवकांनी धुमाकूळ घालित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या वाहनांसह तब्बल बारा वाहनांची तोडफोड केली. ही घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. दोन्ही माथेफिरू युवक ‘सीसीटीव्ही’ कॅमेºयात कैद झाले असून पोलिसांपुढे दोन्ही आरोपी शोधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
दुचाकीवर स्वार असलेल्या अज्ञात दोन युवकांनी काल मध्यरात्री दर्डानगरसह वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाºया नगरात चांगलाच धुमाकूळ घातला. सर्वप्रथम दर्डा नगरात वाहनांची तोडफोड केल्याचे सांगितल्या जाते. विशेष म्हणजे तोडफोड करण्यात आलेल्या वाहनांमध्ये राष्टÑवादीच्या नेत्यांसह मनसे जिल्हाध्यक्ष अशोक पुरी यांच्या वाहनाचा समावेश आहे. त्यानंतर दुचाकीस्वारांनी आपला मोर्चा श्रीकृष्णनगर, महादेवनगर, शिवाजीनगर, ओमसोसायटी, दाते कॉलेज चौकात वळविला. घरासमारे उभ्या असल्याल्या वाहनांवर दगडफेक करून काचा फोडल्या. ही बाब सकाळी उघडकीस येताच खळबळ उडाली. ही तोडफोड नेमकी कोणत्या उद्देशाने करण्यात आली. याबाबत चर्चेला उधाण आले आहे. दर्डानगर, श्रीकृष्णनगरात वाहन फोडल्यानंतर दुचाकीस्वार महादेवनगरकडे येत असताना विधाता कोचिंग क्लासेससमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले. मात्र रात्री अंधार असल्याने चित्र स्पष्ट दिसत नाही. याच परिसरातील संजय ढोक यांचे एम.एच.२९/आर ४७०७ या वाहनाच्या काचा फोडल्या. सीसीटीव्हीत दाखविल्याप्रमाणे तेव्हा रात्रीचे १ वाजून १३ मिनिट झाले होते. कृषीनगरातील राहुल दौलतकर यांचे एम.एच. ३२/ एम १ या क्रमांकाचे वाहन फोडले. ओम सोसायटीत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांचे निवास्थान आहे. रात्री बाहेरून आल्यानंतर त्यांचे वाहन घरासमोर उभे होते. तर देशमुख आतमध्ये कामात व्यस्त असताना बाहेर वाहनांवर दगडफेक केल्याचा आवाज आला. लगेच त्यांनी बाहेर येऊन बघितले असता दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाले होते. त्यांनी स्कोडा क्रमांक एम.एच. ४३/ एजे ५६९७, एम.एच.२६/एल १४४४ या वाहनांचे नुकसान केले. त्यानंतर दाते कॉलेज चौकातही असाच धुमाकूळ घालून तोडफोड केली. याप्रकरणी वाहनधारकांनी वडगाव रोड पोलीस ठाणे गाठून पोलिसात तक्रार दिली. वाहनांचे नुकसान झालेल्यांमध्ये जि.प.अध्यक्ष प्रवीण देशमुख, शशिकांत भूते (दाते कॉलेज चौक), राहुल दौलतकार (कृषीनगर), संजय ढोक(महादेवनगर),डॉ. निशांत चव्हाण (शिवाजीनगर), डॉ. राजेश खडसे (श्रीकृष्णनगर) आदींचा समावेश आहे. काही वाहनधारकांनी पोलिसात तक्रार केली नसल्याने बारा वाहनांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलीस सूत्राने वर्तविली आहे. अज्ञात दुचाकीस्वारांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांचे वाहन ‘टार्गेट’ केल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे.









