जिल्हा रुग्णालयाच्या अधिष्ठातांवर खडणीचा गुन्हा

index
डॉक्टरला खंडणी मागणे भोवले
यवतमाळ – येथील कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉक्टरला खंडणी मागितल्याप्रकरणी अधिष्ठातासह एका व्यक्तीविरूद्घ  शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालात डॉ. आनंद डोंगरे हे अधिष्ठाता पदावर कार्यरत आहे. तर याच महाविद्यालयात डॉ. प्रशांत चक्करवार (३४) रा. यवतमाळ हे मनोरुग विशेषतज्ञ या पदावर १३ आॅगस्ट रोजी रुजू झाले. ते कर्तव्य बजावित असताना अधिष्ठाता डोंगरे हे त्यांना नाहक त्रास देत होते. चक्करवार यांची पत्नी सुध्दा रुग्णालयातच कार्यरत असून त्यांनाही त्रास दिला. दरम्यान डोंगरे यांनी डॉ. चक्करवार यांची ड्यूटी बाह्यरुग्ण विभागात लावून  खोटे आरोप करुन पुन्हा वेठीस धरले. यावेळी डॉ. डोंगरे यांनी चक्करवार यांच्या सह्या घेऊन तुला व तुझ्या पत्नीला नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी दिली. अधिष्ठाता कडून रुजू झाल्यापासूनच त्रास देण्यात येत असल्याने चक्करवार त्रस्त झाले होते. दरम्यान डोंगरे यांच्या सांगण्यावरून गिरमे नामक व्यक्तीने चक्करवार यांना पैशाची मागणी करून प्रकरण दडपण्याची हमी दिली. अधिष्ठाताकडून चक्क खंडणी मागण्यात येत असल्याची तक्रार चक्करवार यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून डोंगरे याचे विरुध्द तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी दोघाविरुध्द खंडणीचा गुन्हा नोंद केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


three × 3 =