
लाडखेड (यवतमाळ) – रात्रीच्यावेळी बसस्थानकासमोर उभ्या केलेल्या कंन्टेनरचे १५ चाके चोरट्यांनी चोरुन नेल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री एम.एच. ४०/ वाय ८४८० क्रामंकाचा कन्टेंनर येथील बसस्थानकासमोर उभा होता. अशातच रात्रीच्यावेळी चोरट्याने कंन्टेंनरला जॅक ऐंवजी दगडाचा वापर करून १५ चाके व डिक्स (किंमत पाच लाख) चोरुन नेले.आज सकाळी ही बाब चालकाच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच लाडखेडचे ठाणेदार सतीश पाटील, पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर, गजानन शेजुलकर, नागोराव मेश्राम, अनील आडे, दिपक शेंडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.









