
आर्णी – यवतमाळ वरून आर्णीकडे येणाºया टोयाटो वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तीन जण जखमी झाल्याची घटना आज रविवारी सायंकाळी ६ वाजता येथील वीज उपकेंद्राजवळ घडली.
दिलीप देविदास भरबडे, अश्विन अशोक तीजारे, दिनेश राजेंद्र डेहणकर सर्व रा. कापरा ता. यवतमाळ असे जखमींची नावे आहेत. ते आपल्या दुचाकीने (एम.एच. २९ / एजी ३८६३) आर्णीवरून यवतमाळकडे जात होते. अशातच समोरून येणाºया टॉयाटो वाहनाने (एम. एच. १२/ डिई १९८३ ) वीज उपकेंद्राजवळ धडक दिली. यामध्ये तीघेंही जखमी झाले असून रुग्णालात उपचार सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालकाविरुद्घ गुन्हा दाखल केला.









