
नेर – चांदूररेल्वे येथून नेर येथे येणाºया दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दोन युवक ठार झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी ४.३० वाजता खरबी या गावाजळ घडली. आकाश चंद्रशेखर वानखेडे (२५) रा. शिवाजी नगर नेर, शुभम धोटे (२३) रा. मडकोना ता. कळंब अशी मृतकाची नावे आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथून औषधी घेऊन ते दुचाकीने ( एम.एच. २७ / ३५५८) नेर येथे येत होते. अशातच औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील खरबी या गावाजवळ ट्रकने (ओ.डी. १५/ बि ५११४) दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये आकाश हा जागीच ठार झाला. तर शुभमचा अमरावती येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रक चालक सुशांत बियाणी (२५) रा. ओडीसा याच्याविरोध्द गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.









