ट्रकच्या धडकेत युवक ठार

दिग्रस – भरधाव ट्रकने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री ९.३० वाजता महागाव येथे घडली. विठ्ठल श्रीराम सुरोशे (३०) रा. लाख रायाजी असे मृतकाचे नाव आहे. तो महागाव येथील बसस्थानकावर उभा होता. अशातच समोरून आलेल्या सिमेंट नेणाºया ट्रकला (एम.एच. २९/ टि. ६२१) त्याने हात दाखवून थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने ट्रक न थांबविता सदर युवकाला जोरदार धडक दिली. यामध्ये मागील चाकात येऊन विठ्ठल जागीच ठार झाला. यावेळी चालक ट्रक घेऊन पसार झाला होता. मात्र ग्रामस्थांनी तुपटाकळी येथील युवकांना या अपघाताची माहिती देऊन ट्रकचा क्रमांक कळविला होता. त्यावरून तुपटाकळीवासीयांना हा ट्रक अडवून चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


4 + three =