ट्रक अपघातात दोन ठार

यवतमाळ, दि. १०  – भरधाव ट्रक नाल्यात पलटी झाल्याने दोन जण ठार झाल्याची घटना पांढरकवडा तालुक्यातील कोंघारा येथे आज सकाळी ६ वाजता घडली. चालक संदिप महेश यादव (२१) रा. घुगरी कसाई शिवणी, सुनील दिम्मु यादव (२६) रा. ठामरी मध्यप्रदेश अशी मृतकांची नावे आहे. जबलपूर येथून एम.पी. २० / एच.बी. ४९१५ क्रमांकाचा ट्रक हैद्राबाद येथे सिमेंट विट घेऊन जात होता. अशातच पांढरकवडा येथून चार किमी अंतरावर असलेल्या कोंघारा या गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक नाल्यात कोसळला. यामध्ये चालक संदिप यादव, सुनील यादव हे दोघेंही जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संतोष माने, खंडागळे, राठोड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. नागरिकांच्या मदतीने मृतकांना बाहेर काढून शवविच्छदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


three × = 15