यवतमाळ – मोहदा येथून जवळच असलेल्या अंतरगाव येथे भरधाव ट्रकने सायकलला धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी ४ वाजता घडली. यामध्ये एक ल्बालक जागीच ठार झाला असून एक जण जखमी आहे.
वैभव गजानन सहस्त्रबुद्घे (१२) रा. अंतरगाव असे मृतकाचे तर मयुर सुभाष सहस्त्रबुद्घे (१५) असे जखमीचे नाव आहे. काल दुपारी ते सायकलने रस्ता ओलांडत होते. अशातच मेटीखेडा येथून राळेगावकडे जाणाºया ट्रकने (ए.पी. १६/ टी.ए.७५६७) सायकलला धडक दिली. यामध्ये वैभव व मयुर हे दोघे गंभीर जखमी झाले. त्याना यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान वैभवचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त नागरिकांनी मेटीखेडा-राळेगाव मार्गावर रस्ता खोदून चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती होताच सायंकाळी वडगाव जंगल पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त ट्रक जप्त केला. चारवर्षापूर्वी वैभवच्या वडीलांचाही मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ आता वैभवचाही अपघाती मृत्यू झाल्याने त्याची आई नलुबाई सहस्त्रबुद्घे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.









